#

Advertisement

Saturday, June 29, 2024, June 29, 2024 WIB
Last Updated 2024-06-29T11:56:49Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ठाकरे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री?

Advertisement

शरद पवार मोजून 6 शब्दात म्हणाले,... 
मुंबई :उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील का? असा थेट प्रश्न विचारला असता. पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी अवघ्या 6 शब्दांमध्ये उत्तर दिल आहे. सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे, असं उत्तर शरद पवारांनी दिल आहे. आमची आघाडी हाच आमचा समुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.   
संजय राऊत यांनी पत्रकारांशी चर्चा करताना, मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेला अनेक घटकांनी उद्धव ठाकरेंना पाहून मतदान केलं आहे. अर्थात तिन्ही पक्षांची एकत्र ताकद होती. मात्र बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, असं सूचक विधान केलं होत. या पार्श्वभूमीवर पवार याना पत्रकाराने प्रश्न विचारला असता पवार यांनी वरील स्पष्टीकरण दिले,  

राज्यात सरकार बदलण्याचा आमचा प्रयत्न
288 विधानसभा निवडणुकीत 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्हाला अनुकूल परिस्थिती असून संधी आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. लोकसभेची मानसिकता विधानसभेलाही कायम राहील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच मोदींनी महाराष्ट्रात 18 जागी सभा घेतल्या त्यापैकी 14 जागी भराव झाल्याची आठवण पवारांनी करुन दिली.