#

Advertisement

Friday, June 28, 2024, June 28, 2024 WIB
Last Updated 2024-06-28T11:58:03Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी

Advertisement

पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचे आदेश
मुंबई :राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सगळेच राजकीय पक्ष लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या हालचाली होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची कार्यकारणी जळगाव जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटातील ही घडामोड महत्वाची आहे. तर जळगावच्या जिल्हाध्यक्षांनीही पराभवाची जबाबदारी स्विकारत आपला राजीनामा दिला आहे.लोकसभेच्या पराभवाचे जबाबदारी स्वीकारत जळगाव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने त्याची जबाबदारी म्हणून राजीनामा दिल्याचं जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी म्हटलं आहे. रावेर लोकसभेत मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला. हा पराभव ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देत आहे, अशी प्रतिक्रिया रवींद्र पाटील यांनी दिली आहे.