Advertisement
सोलापूर : भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या प्रभागात देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बांधणी सुरू केली आहे. महासेवा शिबिराच्या माध्यमातून जनतेला जोडले जात आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शहर भाजपच्यावतीने प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मिळालेल्या प्रचंड प्रतिसादा नंतर आता प्रभाग १८ मधील हनुमान मंदिर पटांगण येथे निशुल्क महासेवा शिबिर घेण्यात आले. याचा २ हजार ०१८ जणांनी लाभ घेतला.
भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून हे शिबिर घेण्यात आले.यावेळी मोफत आधार नोंदणी व दुरुस्ती, ई-श्रम नोंदणी,आयुष्मान कार्ड, मतदान नोंदणी व दुरुस्ती, रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सेवा एकूण २०१८ लोकांसाठी देण्यात आल्या. एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळला. भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले.
