Advertisement
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत. आपल्याला पक्ष संघटनेच्या कामासाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावं असं त्यांनी म्हटलं आहे. फडणवीसांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विरोध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून पक्ष संघटनेचं आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करावं, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुपारी दिल्लीसाठी रवाना झाले. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर आज एनडीएच्या सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि खासदारांची संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या घटक पक्षांन, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठीच्या प्रस्तावावर समर्थन दिलं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनमोकळेपणाने मोदी सरकारचा गाजावाजा करत भूमिका मांडली यावेळी देवेंद्र फडणवीस मात्र कोठे दिसले ही नाहीत.
