#

Advertisement

Monday, June 24, 2024, June 24, 2024 WIB
Last Updated 2024-06-24T11:33:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्र्यांनी गुप्तता पाळली !

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणूक संपल्यापासूनच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक हिंट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय. मंत्रिमंडळाच्या फॉरम्युल्यावर चर्चा झाली नाही. आज किंवा उद्या याबाबतची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्री एकनाथ यांनी याबाबत गुप्तता पाळली आहे, असं संजय शिरसाट यांनी सांगितले.
दरम्यान,  अडीच  वर्ष तुम्ही काय गोट्या खेळत होता का? तुम्ही आपल्या पोलीसांवर अविश्वास दाखवून ड्रग्ज माफियांना प्रोत्साहन देत आहेत. यातून पैसा आणि सत्ता हे बोलणं योग्य नाही. जे यावर टीका करतात ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत. संजय राऊत यांना आता आठवलं वाटतं… मुख्यमंत्री घटनाबाह्य आहेत की नाहीत हे ठरवणारा तू कोण? तू जज आहेस का? यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हणत संजय शिरसाटांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.