#

Advertisement

Tuesday, June 25, 2024, June 25, 2024 WIB
Last Updated 2024-06-25T11:08:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेश

पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार? पण, हे सगळ कसं होणार?

Advertisement

बीड : पंकजा मुंडेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी राज्यसभेत लागणार अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मंत्रीपद द्यावे अशीही मागणी केली जात आहे. बीड जिल्ह्यातील सानपवाडी गावाने एक मुखी ठराव करत पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. पराभवानंतर अनेकवेळा पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत येतं मात्र त्यांना कोणतही मंत्रीपद मिळत नसल्यानं त्यांना संधी द्यावी अशी, या गावक-यांची मागणी आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचं पुनर्वसन झाल्याशिवाय भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका या गावक-यांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा निसटता पराभव झाला.. मात्र या पराभवानंतर मराठवाड्यासह महाराष्ट्रातला ओबीसी समाज दुखावल्याची चर्चा आहे.. त्यामुळेच आता पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दिल्लीत झालेल्या बैठकीतही पंकजा मुंडेंच्या पुनर्वसनाची चर्चा झाल्याची माहिती आहे.. राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलाय.. त्याचमुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर घ्या असा सूर राज्यातल्या काही नेत्यांचा आहे.. केंद्रीय नेतृत्त्वाला तशी विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.