#

Advertisement

Saturday, July 13, 2024, July 13, 2024 WIB
Last Updated 2024-07-13T12:46:30Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो..,

Advertisement

समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांची भावनिक साद

मुंबई : व्यासंगी आणि अभ्यासू आमदार म्हणून शिक्षक मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेल्या कपिल पाटील यांनी अखेर त्यांच्या मनातील खदखद बाहेर काढली. मुंबई शिक्षक मतदारसंघात धनलक्ष्मी आणि धनदांडग्यांनी कहर केल्याचा आरोप त्यांनी यापूर्वी केला होता. आता समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी आता तूर्त आपल्या सर्वांची रजा घेतो, अशी भावनिक साद घातली आहे. त्यातच त्यांनी महाविकास आघाडीवर चांगलेच तोंडसूख घेतले आहे. 
कपिल पाटील हे समाजवादी विचाराच्या नेत्यांपैकी एक आहेत. व्यासंगी आणि अभ्यासू नेता म्हणून ठसा उमटवला आहे. विधिमंडळातील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाचे विरोधकच नाही तर सत्ताधारी पण चाहते आहेत. शिक्षणकांसाठी भांडणारा नेता म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. पण नुकत्याच झालेल्या मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतील गैरप्रकारावर त्यांनी तोंडसूख घेतले. त्यांच्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर त्यांनी निरोपाचा संदेश सर्व कार्यकर्त्यांसाठी लिहिला आहे. त्याची सध्या समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगवर भावनांना वाट मोकळी करुन दिली. मुंबई शिक्षक मतदार संघातून ते सलग तीन वेळा निवडून आले. 18 वर्षे त्यांनी शिक्षकांचे प्रतिनिधीत्व केले. आता मुदत संपल्याने त्यांनी सर्वांची रजा घेतली. त्यावेळी त्यांच्या भावना दाटून आल्या. त्यांनी निरोपाच्या संदेशात मनातील हे कोलाहल शब्दात बद्ध केले.