Advertisement
अमित शहा यांच्यासोबत बैठक
मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पाच जागांवर विजय मिळवत शरद पवार यांना धक्का दिला. त्याचवेळी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने दोन, दोन जागा जिंकल्या. ष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या या यशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी तातडीने दिल्लीला पोहचले. त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर अजित पवार पुन्हा मुंबईत परत आले. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसह आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची चर्चा आहे.
