#

Advertisement

Saturday, July 13, 2024, July 13, 2024 WIB
Last Updated 2024-07-13T12:27:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सगळ्या पक्षांनी मिळून केला पवार साहेबांचा करेक्ट कार्यक्रम ?

Advertisement

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिसरी जागा लढवण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय अंगलट आल्याचं चित्र शुक्रवारी विधानसभेमध्ये पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठींब्यावर उभे राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या पराभावामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील धुसपूस समोर आली आहे, असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शरद पवारांना जयंत पाटलांच्या पराभवावरुन सगळ्या पक्षांनी मिळून करेक्ट कार्यक्रम ? असा टोला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
जयंत पाटील यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या 12 आमदारांची मतं मिळतील असं अपेक्षित होतं. घडलंही त्याप्रमाणेच त्यांना 12 मतं मिळाली. मात्र त्याचबरोबर इतर मित्रपक्षांकडून त्यांना मतदान होईल असं मानलं जात असताना एकही अतिरिक्त मत त्यांना मिळालं नाही. सगळ्या पक्षांनी मिळून हे ठरवूनच केले आहे, अशी खोचक प्रतिक्रिया  देशपांडे यांनी नोंदवली आहे.