#

Advertisement

Monday, July 22, 2024, July 22, 2024 WIB
Last Updated 2024-07-22T12:47:37Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी आमदार धनाजी साठे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड

Advertisement

सोलापूर : जिल्ह्यातील माजी आमदार धनाजी तात्या साठे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना सोलापुरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना माईंल्ड ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना तातडीने सोलापुरात हलवण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांचे चिरंजीव दादा साठे व सून मिनल साठे असे कुटुंबीय उपस्थित आहेत. दरम्यान धनाजी साठे यांना अश्विनी मध्ये दाखल केल्याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे वरीष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तूरे व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष बापू पाटील यांनी तातडीने हॉस्पिटल मध्ये जाऊन भेट घेतली. दादा साठे यांनी प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले असून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार सत्यजित तांबे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी विचारपूस केल्याचे सांगितले.