#

Advertisement

Friday, July 12, 2024, July 12, 2024 WIB
Last Updated 2024-07-12T13:09:42Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

अखेर पंकजा मुंडे मोठ्या फरकाने विजयी

Advertisement

वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष
मुंबई : आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
विधान परिषद 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. खासकरून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी निर्धारीत करण्यात आलेल्या कोट्यापेक्षा अधिक मते घेऊन विजय मिळवला आहे. विजयासाठी 23 मते आवश्यक होती. पण पंकजा मुंडे यांनी 26 मते मिळवली आहेत. त्यांनी तीन अतिरिक्त मते घेतली आहेत. त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे.