Advertisement
विधान परिषदेत उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय
मुंबई : विधान परिषदेचा पहिला निकाल आता समोर आला आहे. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय झाला आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा पहिला निकाल आता समोर आलाय. भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर हे 23 मतांचा कोटा पूर्ण करत विजयी झाले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा पहिला निकाल हा भाजपच्या बाजूने लाग ला आहे. योगेश टिळेकर हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून जिंकून आले होते. ते हडपसर विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले होते. त्याआधी ते पुणे महापालिकेत नगरसेवक होते. योगेश टिळेकर यांच्यावर पक्षांतर्गत अनेक जबाबदाऱ्या पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. त्या त्यांनी पूर्ण केल्या होत्या. यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत योगेश टिळेकर यांचा विजय झाला.
