#

Advertisement

Tuesday, July 9, 2024, July 09, 2024 WIB
Last Updated 2024-07-09T13:08:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपला संभाजीनगर आणि उदगीर मध्ये झटका

Advertisement

माजी उपमहापौर आणि  माजी आमदारांचा राजनामा 
मुंबई : भाजपला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण राजू शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. हा मोठा झटका बसलेला असतानाच भाजपला आणखी एक दुसरा मोठा धक्का बसणार आहे. मराठवाड्यातीलच भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या माजी आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून प्रवेशाची तारीखही ठरली आहे.
भाजपाचे उदगीर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भालेराव हे येत्या 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. सुधाकर भालेराव हे उदगीरमधील मोठं प्रस्थ आहे. लातूर जिल्ह्यात त्यांचा मोठा दबदबा आहे. त्यांनी पक्ष सोडल्याने त्याचं भाजपला मोठं नुकसान होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.