#

Advertisement

Tuesday, July 9, 2024, July 09, 2024 WIB
Last Updated 2024-07-09T12:53:50Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

शरद पवार गट देणगी स्वीकारू शकणार

Advertisement


विधानसभा निवडणुकीपूर्वी होणार "लक्ष्मी" प्रसन्न
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या एका निर्णयाने  विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला "लक्ष्मी" प्रसन्न होणार आहे.  राज्यातील शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोगाने देणग्या घेण्याची रीतसर परवानगी दिली आहे.
शरद पवार गटाने  8 जुलै रोजी  जनतेकडून स्वच्छेने देणगी घेण्यासाठी पक्षाचा दर्जा देण्याची विनंती केली होती. आयोगाने लोकप्रतिनिधी अधिनियम 1951च्या कलमातंर्गत सरकारी कंपनी व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती अथवा कंपनीकडून स्वच्छेने दिलेली देणगी स्वीकारण्यासाठी शरद पवार गटाला मान्यता दिली. त्यामुळे आर्थिक मदत घेण्याचा गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार गटाच्या 8 नेत्यांनी कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात सोमवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यापूर्वी गटाला देणगी स्वरुपात कुणाकडूनही धनादेश घेता येत नव्हता. इतर राजकीय पक्षांप्रमाणे गटाला देणगीवर कर्ज पण मिळत नव्हते.  निवडणूक आयोगाने देणगी घेण्याची परवानगी दिली आहे.