#

Advertisement

Monday, July 8, 2024, July 08, 2024 WIB
Last Updated 2024-07-08T13:23:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते हेच माझे पाठबळ !

Advertisement


महाराष्ट्र दौऱ्याबाबत अ‍ॅड. कोमलताई यांची प्रतिक्रिया

सोलापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण असताना अनेक जण आपापल्या मतदारसंघात घिरट्या मारू लागले आहेत. अनेक, आयड्याच्या कल्पना वापरल्या जात आहेत. परंतु, अशा वातावरणात बहुजन रयत परिषदेच्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे वेगळेपण नेहमीप्रमाणे लक्षात येत असल्याचे मत राजकीय विश्‍लेषक मांडत आहेत. राजकारण बाजुला ठेवीत अ‍ॅड. कोमलताई यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ओळखत बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या अडचणी जाणून घेण्यासह त्या-त्या परिसरातील कामगार, शेतकरी, महिला बचतगट, छोटे व्यावसायिक आदींच्या समस्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे. बहुजन रयत परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असल्याची आणि हेच माझे पाठबळ अ‍ॅड. कोमलताई यांची प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असलेल्या अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे व्यक्तीमत्त्व त्यांच्या आई कै. अनुराधा यांच्याप्रमाणेच असल्याचे राजकीय विश्‍लेषक सांगतात. आई प्रमाणेच सामान्यातील सामान्य लोकांत, कुटुंबात मिसळणे तसेच समाजातील माणसांची काळजी घेणे, असे गुण त्यांच्यातही दिसतात. आईच्या निधनानंतर त्या वडीलांचा आधार म्हणून अनेक ठिकाणी पुढे आल्याचे सर्वांनी पाहिलेलेे आहे. बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांनी वडीलांचे कार्य राज्यभर सुरू ठेवले आहे. 15 हजार महिलांचा उमंग महिला महोत्सव यासह आरोग्य शिबीर, टोल विरोधी आंदोलन, बार्टीतील भ्रष्टाचार आंदोलन, वाढीव वीजबील विरोधी आंदोलन, बचतगट मेळावे असे जनकल्याणाचे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक जण मुहूर्तावर कामे करतात परंतु, अ‍ॅड. कोमलताई यांच्याकडून कामांचा ओघ गेली अनेक वर्षे सातत्याने सुरू आहे, कुठलीही अपेक्षा न ठेवता त्या कार्यरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. यावेळी बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासोबत २१ जुलै ते २८ जुलै या कालावधीत आयोजित केलेला महाराष्ट्र दौरा हे त्याचेे आणखी एक उदाहरण सांगता येईल. 

रविवार २१ जुलै २०२४  या दिवशी स.११.०० ते सायं. ४.०० स्थळ : नागपूर विभाग : वर्धा  यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

सोमवार २२ जुलै २०२४  या दिवशी स.११.०० ते सायं. ४.०० स्थळ : अमरावती विभाग : अमरावती यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ वाशीम, बुलढाणा येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

मंगळवार २३ जुलै २०२४ या दिवशी  स.११.०० ते सायं. ४.००  स्थळ : मराठवाडा विभाग- लातूर यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

बुधवार २४ जुलै २०२४ या दिवशी स.११.०० ते सायं. ४.००  स्थळ : पश्चिम महाराष्ट्र विभाग- पंढरपुर यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. 

रविवार २८ जुलै २०२४ या दिवशी  स.११.०० ते सायं. ४.०० स्थळ : उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक यामध्ये नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, अहमदनगर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

यावेळी  प्रदेश कार्यकारिणी सदस्य सिद्राम दत्तात्रेय जावीर,  प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित एकनाथ पाटील, प्रदेश सरचिटणीस इश्वर मल्हारी क्षिरसागर, प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र पितांबर वाकळे , प्रदेश उपाध्यक्ष नारायण साठे, प्रदेश संपर्क प्रमुख दत्तात्रय दगडू पाटील, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी महादेव गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष श्रीमंत गोरोबा गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष अशोक सोपानराव जाधव, विभागीय प्रमुख पश्चिम महाराष्ट्र आबा वाघमारे, विभागीय अध्यक्ष मराठवाडा महाराष्ट्र राजीव केशवराव कसबे , कार्याध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अनिल मोहन बाविस्कर, अजय महादेवराव डोंगरे विभागीय अध्यक्ष नागपूर विभाग, संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र रविंद्र दामू पाटील, विभागीय प्रमुख उत्तर महाराष्ट्र साहेबराव पंढरीनाथ श्रृंगार, प्रवक्ते उत्तर महाराष्ट्र धनंजय जाधव, उत्तर महाराष्ट्राचा संघटक ज्ञानेश्वर (नाना) जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तर, नियोजन  मध्यवर्ती संपर्क कार्यालय 7030155552/9922558001 तसेच श्री. ईश्वर क्षीरसागर 9075555091 विशाल खंदारे 9689965008 यांनी केले आहे.