#

Advertisement

Tuesday, July 9, 2024, July 09, 2024 WIB
Last Updated 2024-07-09T12:15:07Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

चार पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढविणार !

Advertisement

मुंबई : महाष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत.  विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकासआघाडीने कंबर कसली आहे. अशातच आता महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार आहे. महाराष्ट्रातील चार स्थानिक राजकीय पक्ष एकत्र येणार आहेत. हे चार ही पक्ष एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. 
विधानसभा निवडणुकीसाठी बच्चू कडू तिसरी आघाडी उभी करण्याच्या तयारीत आहे. बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. लवकरच बच्चू कडू आणि संभाजीराजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार आहे.
राज्यात महायुती आणि मविआनंतर लवकरच तिसरी आघाडीनिर्माण होऊ शकते. यासंदर्भात बच्चू कडूंना विचारलं असता त्यांनी मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा न झाल्यास वेगळा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली. तसंच तिस-या आघाडीचा पर्याय चांगला ठरू शकेल असं रविकांत तुपकरांनी म्हटल आहे.