#

Advertisement

Saturday, July 6, 2024, July 06, 2024 WIB
Last Updated 2024-07-06T11:46:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

बारामतीत विधानसभेला काका विरुद्ध पुतण्या?

Advertisement

खासदार सुप्रिया सुळे यांनी केले सूचक विधान 

बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई पाहायला मिळाली आता पुन्हा इथे पवार विरुद्ध पवार लढाई पाहायला मिळणार अशी शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमधील संभाव्य काका-पुतण्या लढाई म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढाईबद्दल त्यांनी सूचक विधान केलं आहे.
बारामतीमधील विधानसभेच्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळेंनी, माझ्यासाठी विधानसभेची निवडणूक इंडिया आलायसेस विरुध्द एनडीए अशी आहे. मी कोणतीही निवडणूक व्यक्तीच्या विरोधात लढत नाही. माझी लढाई ही वैचारिक असते. हे माझ्या कृतीतून आणि भाषणात दिसते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जिल्हा नियोजन मंडळ निधीसंदर्भात अजित पवारांना लिहिलेल्या पत्राबद्दल बोलताना सुप्रिया सुळेंनी, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी पत्र लिहिलं आहे याचा कारण की अमोल कोल्हे आणि मला निधी मिळत नाही. जनतेच्या कामासाठी आम्ही निधी मागत आहोत. आम्ही निवडून आलेल्या लोकांचे प्रतिनिधी आहोत. पाच टक्क्यांचा तर आमचा अधिकार आहे ना? आम्ही आमच्या कामसाठी निधी मागत नाही. लोकांचा विकास हवा आहे. आम्हाला क्रेडीट नको. आमचं काम आहे लोकांच्या सेवेसाठी आम्ही निधी मागत आहोत.