#

Advertisement

Friday, July 19, 2024, July 19, 2024 WIB
Last Updated 2024-07-19T11:54:26Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापुरात मोची समाजाला आमदारकीची संधी ?

Advertisement

सोलापूर : काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार झाल्याने  या मतदारसंघातून अनेकांना संधी उपलब्ध झाली आहे. शिंदे यांना मागील तीन निवडणुकांमध्ये मध्य या मतदारसंघातील मोची समाजाने सर्वाधिक मते देऊन त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण वाटा उचलला असल्याचा दावा केला जातो.
सोलापुरात मोची समाजाची एक गठ्ठामध्ये असल्याने ही मते निर्णायक ठरतात. आजपर्यंत सोलापूर शहरातून मोची समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. प्रणिती शिंदे या खासदार झाल्याने आता मोची समाजातून अनेक कार्यकर्त्यांची नावे समोर येत आहेत. खासदार प्रणिती शिंदे यांचे अतिशय कट्टर समर्थक मानले जाणारे अंबादास बाबा करगुळे यांच्या नावाची समाजातून जोरदार मागणी होत आहे.
श्री आदि जांबमुनि महाराज रथोत्सव मध्ये प्रणिती शिंदे या खासदार होण्याच्या पूर्वीच अंबादास करगुळे यांनी भावी आमदार म्हणून चर्चेला तोंड फोडले होते. आता प्रणिती शिंदे खासदार झाल्याने पुन्हा बाबा करगुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.
करगुळे यांचे घराणे कट्टर काँग्रेस समर्थक मानले जाते. यापूर्वी अंबादास करगुळे यांचे वडील सायबण्णा करगुळे त्यांच्या आई हनमंतीबाई करगुळे यांनी महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. आता करगुळे यांच्या पत्नी वैष्णवी करगुळे यांनीही नगरसेविका म्हणून पाच वर्षे चांगले काम केले. युवक अध्यक्ष असताना बाबा करगुळे यांनी सोलापूर शहरांमध्ये युवकांमध्ये काँग्रेस रुजवली. मोची समाजातील युवकांमध्येही अंबादास करगुळे यांची क्रेझ आहे,