#

Advertisement

Friday, July 19, 2024, July 19, 2024 WIB
Last Updated 2024-07-19T11:55:33Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

सोलापूरचे तिन्ही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचेच

Advertisement

काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठकीत निर्णय 

सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर सोलापुरात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ॲक्टिव झाले आहेत. शहरातील तिन्ही  विधानसभा मतदारसंघावर कार्यकर्ते आता दावा सांगत आहेत. 20219 च्या निवडणुकामध्ये आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसला सुटलेल्या शहर उत्तर मतदारसंघाबाबत यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला माजी सभापती सुनील रसाळे, सुदीप चाकोते, अशोक कलशेट्टी, हेमा चिंचोळकर, संजय शिंदे, दत्तू बंदपट्टे, एन के क्षिरसागर, चक्रपाणी गज्जम, पुरुषोत्तम श्रीगादी, वीणा देवकlते, भारती इप्पलपल्ली, नुरअहमद नालवार यांची उपस्थिती होती.
विश्वनाथ चाकोते यांनी मी उमेदवारी इच्छुक नाही. पण पक्षाने दिलेल्या उमेदवाराला आमदार करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शहर उत्तर हा काँग्रेसचा आहे, दोन वेळा त्यांच्या उमेदवाराचे डीपॉझिट जप्त झाले, मग हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला पाहिजे अशी मागणी या बैठकीत रसाळे यांनी केली. या बैठकीत उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी उत्तर हा काँग्रेसला मिळावा यासाठी पक्ष श्रेष्ठीवर दबाव टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान,  शहर उत्तर मधून सुदीप चाकोते, सुनील रसाळे, राजन कामत, सुशील बंदपट्टे यांची नावे चर्चेत आहेत. भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेले अशोक निंबर्गी सुद्धा चांगले उमेदवार होऊ शकतात. आंबेडकरी समाजातील संध्या काळे या सुद्धा इच्छुक आहेत. सातलिंग शटगार यांनीही उमेदवारी मागणी केली आहे. माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांची भूमिका अद्याप उघड नाही.