#

Advertisement

Monday, July 15, 2024, July 15, 2024 WIB
Last Updated 2024-07-15T11:49:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ओबीसी उमेदवाराला मत देणाऱ्या मराठा नेत्यांना आम्ही पाडणार !

Advertisement

छत्रपती संभाजीनगर |: विधान परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला मत देणाऱ्या मराठा नेत्यांना आम्ही पाडणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आयोजीत करण्यात आली होती. हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले होते. त्यांना संबोधित करताना मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला आहे. यावेली त्यांनी 20 जुलैपासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचंही जाहीर केलं आहे.
मराठ्याचं मतदान घेऊन जे विधान परिषदेवर आमदार झाले आहेत त्यांनी त्रास दिला, तर ज्या मराठ्याच्या आमदाराने त्याला मतदान केलं त्याला पहिलं पाडणार असा इशाराही त्यांनी दिला आहे. विधानपरिषदेच्या कोणत्या आमदाराला कोणत्या मराठा आमदाराने मतदान केलं त्याची यादी आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली. 

अंतरवालीत 20 जुलैला आमरण उपोषण
अंतरवालीत 20 तारखेला आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार. 20 तारखेला विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार निवडुन द्यायचे की पाडायचे याचा निर्णय घेणार. जर निर्णय घेतला नाही तर मुंबईलाही जाणार आणि 288 उमेदवार देखील पाडणार. 20 तारखेला राज्यातील मराठ्यांच्या बैठकीची तारीख जाहीर करणार तसंच मुंबईला कधी जायचं याचा निर्णय देखील 20 तारखेला घेणार अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.