Advertisement
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा टोला
मुंबई : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज शरद पवारांची भेट घेतली. छगन भुजबळ आणि शरद पवारांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. शरद पवार आजारी असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली होती. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भुजबळांचे नाव घेत जबरदस्त टोला लगावला आहे.
भुजबळ साहेब दुटप्पी भूमिका घेत आहेत. एकीकडे बारामतीला टीका करायची आणि नंतर पवार साहेबांना आज भेटायला जाऊन आपण मार्गदर्शन करा असं सांगायचं ही दुटप्पी भूमिका आहे. काल राजकीय भाषण करत जोरदार टीका केली. पण आज राज्य शासनातर्फे विनंती करत आहे, हे सुरु आहे. त्यांनी परतीचे प्रयत्न केले तरी त्यांना परत घेणार नाही ही आमच्या पक्षाची भूमिका आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.
शरद पवार हे सध्या आजारी आहेत. त्यांची तब्ब्येत ठीक झाली की ते नक्कीच याप्रकरणी मार्गदर्शन करतील, सध्या अजित पवारांच्या आमदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार गटाला स्वतंत्र लढायला लावू शकतात. भाजपचा काहीही भरोसा नाही. ते वेळेवर आम्हाला काढायला लावतील, अशी चर्चा सध्या अजित पवारांच्या आमदारांमध्ये आहे, असेही अनिल देशमुखांनी सांगितले.
