#

Advertisement

Friday, July 12, 2024, July 12, 2024 WIB
Last Updated 2024-07-12T13:21:56Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपचे चार उमेदवार विजयी : अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार विजयी

Advertisement

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल तृमाने, भावना गवळी आणि अजितदादा गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे उमेदवारही विजयी झाले आहेत.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील यांचा परभव झाला आहे. त्यांना 12 मते मिळाली आहेत. तर, भाजपचे सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या पसंतीची अधिक मते घेऊन ते विजयी झाले आहेत. अजितदादा गटाचे राजेश विटेकर हे 23 तर शिवाजीराव गर्जे हे 24 मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजितदादा गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे.