Advertisement
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑगस्टला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?
- धुळे पंचायत समितीच्या बोरीस
- अकोला जिल्ह्यातील बाळापूर
- पंचायत समितीच्या नागपूर जिल्ह्यातील बटवाडी बु, काटोल पंचायत समितीच्या पारडसिंगा
- नागपूर जिल्ह्यातील रामटेक पंचायत समितीच्या बोथिया पालोरा
- या पाचही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
कसा असेल निवडणूक कार्यक्रम?
नामनिर्देशनपत्रे 23 ते 29 जुलै 2024 या कालावधीत स्वीकारली जातील. रविवारी 28 जुलै या सुट्टीच्या दिवशी मात्र नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 30 जुलै 2024 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. तर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचे वाटप 5 ऑगस्ट 2024 रोजी हाईल. 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रीया पार पडेल. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट 2024 रोजी मतमोजणी होईल.
