Advertisement
देवेंद्र फडणवीसांचा श्याम मानव यांना थेट इशारा
मुंबई : श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं. अलीकडच्या काळात सुपारीबाज घुसले आहेत. माझा सिद्धांत पक्का आहे, मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि नादी लागलो तर सोडत नाही. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिव वाझे यांच्याबद्दल काय बोलतायेत याची रेकॉर्डिंग आहे. पण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण मी पुराव्यानिशी बोलत नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी देशमुखांवर दबाव होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि अॅफेडेव्हिटवर सही करा, आदित्य ठाकरेंचं दिशा सालियान प्रकरणात नाव घ्या, तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केला आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्याम मानव यांना थेट उत्तर दिले आहे.
