Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे-ढोबळे यांचा इशारा
वर्धा : अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची निर्मिती करण्यात आली. या महामंडळामार्फत विविध कामे होणार असल्याची आश्वासने सरकारतर्फे देण्यात आली. तर काही कामे मंजूर करण्यात आली. मात्र त्या मंजूर कामाची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. अनेक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून बँका कर्ज द्यायला तयार नाही. याकडे सरकारचे दुर्लक्ष असून,विविध मागण्या महिन्याभरात सोडविल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बहुजन रयत परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष अॅड. कोमल साळुंखे तसेच नागपूर विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने २१ जुलैला वर्धेत विभागीय कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. ऍड. कोलमलताई म्हणाल्या की, मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा परीक्षा तसेच शिक्षण व नोकरीचे प्रमाण वाढणार आहे, असे सरकार सांगत असले तरी प्रत्यक्षात त्याचा फायदा नाही. पुणे संगमवाडी येथे क्रांतीवीर लहुजी साळवे स्मारकासाठी १०१ कोटी रुपये उपलब्ध झाले. तसेच एकूण ४०० कोटी रुपयाच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र एक विटही रचण्यात आली नाही. वाटेगाव येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २५ कोटी रुपये वितरीत करून भूसंपादनासाठी तरतूद केली, मात्र ती कुठे गेली हे माहीत नाही. क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या ६८ शिफारशीपैकी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडे १९ शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक वर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मात्र ते केवळ कागदोपत्रीच झाले. मातंग समाजाला घरकुलाचा लाभ मिळाला नाही. अनुसूचित जातीचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकारी समिती नेमली. त्या समितीचा थांगपत्ता नाही, म्हणून केवळ सरकारने जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात समाजापर्यंत लाभ पोहोचलाच नाही. येत्या महिन्याभरात कामाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. या पत्रकार परिषदेला महिला अध्यक्ष हिराताई खडसे, शहर अध्यक्ष भैय्या मुंगले, जिल्हा उपाध्यक्ष ओम बावणे, सविता माने, सीमा काळे, प्रशांत डोंगरे, विनोद आमटे, किशोर वाघमारे, अनिल डोंगरे, दिगंबर सनेसर आदि उपस्थित होते.