Advertisement
मुंबई : ज्यांना जनतेने, पक्षांने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केला, अशी टीका पवारांनी अजित पवार गटावर केली. निवडणुका झाल्यावर अनेक लोक सोबत येत आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर अनेक लोक सोबत येते आहेत. आजच्या पक्ष प्रवेशाला एक महत्त्व आहे . उदगीर आणि देवळाली या ठिकाणी गेल्या वेळी NCP चा उमेदवार निवडून आला होता. त्यांनी मतदारांचा घात केला आहे. त्यांनी आता पक्ष बदलला आहे. या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते त्यांनी जनतेचा घात केला आहे, उदगीर आणि देवळाली विधानसभा जागा जिंकायचीच आहे. असा निश्चय शरद पवार यांनी केला आहे.
पक्षात अनेक लोक पुन्हा येईल आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे. उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत. नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. मातंग समाज सोबत आला पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी केले.
