Advertisement
लातूर : जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाय.बी. चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत 10 पैकी 08 खासदार निवडून आले आहेत. ही आता खरी सुरुवात झाल्याचे सांगितले. विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल, असा दावा शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा थेट आकडाच सांगितला.
राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमूर्तिला झटका दिला. आता आत्मविश्वास दुणावलेल्या महाविकास आघाडीने विधासभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल असा दावा केला आहे.
विधानसभेला 288 जागांपैकी 225 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्या सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूया.
