Advertisement
\उद्धव ठाकरे यांचे फडणवीस यांना आव्हान
मुंबई : राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार, असा भाजप नेते देवेद्र फडणवीस यांना थेट इशारा देत आता ‘आर किंवा पार’ची राजकीय लढाई सुरु केली. सरळ आहात तोपर्यंत सरळ राहू, वाकड्यात गेले तर तोडून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडले नाही. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती हल्ले केले. बाळासाहेब यांचे नाव घेण्याची त्यांची लायकी नाही, असे त्यांनी म्हटले.
मी जिद्दीने उभे राहिलो आहे. आता राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहणार आहे. मुंबईत राहून तुम्ही मराठी माणसाला घर देणार नाही, नोकरी देणार नाही. चालले तरी काय? जिकडून तुम्ही आला आहात, तिकडे जा. आता या ठिकाणी प्रचाराला या. मग तुमची उरली सुरली गुरमी उतरवतो, असे उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता म्हटले. त्यांना शिवसेना संपवयाची आहे. त्यांच्याकडे एका बाजूला सत्ता, पैसा आणि शासकीय यंत्रणा आहेत. परंतु माझ्या बाजूला कार्यकर्ते आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.