Advertisement
प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवार यांना खोचक सल्ला
मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील त्या भूमिकेसोबत आम्ही राहू त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण आणणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं, याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता शरद पवारांनी अगोदर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे ते सांगावं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका घ्यावी असे पवार म्हणत असेल तर पवारांच्या पक्षाची गरज काय? तुमचा पक्षच गुंडाळून टाका अस म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमच्यासोबत यावं अशी आमदार रोहित पवार यांनी खुली ऑफर दिली होती. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी रोहित पवारांवर निशाण साधला आहे. रोहित पवारांना त्यांच्या आजोबाचा इतिहास माहिती नाही पहिले त्यांनी त्यांच्या आजोबाचा इतिहास बघावा असा टोला आंबेडकर यांनी लगावलाय. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य बघावे मग त्यांनी अध्ययन करावे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केले आहे. त्यावर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी ठोस भूमिका मांडावी, ठोस भूमिका नसताना यावर काय बोलावं, असे आंबेडकर म्हणाले.
