#

Advertisement

Wednesday, July 31, 2024, July 31, 2024 WIB
Last Updated 2024-07-31T11:14:19Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पूजा खेडकरवर कारवाई, UPSC ने रद्द केले पद

Advertisement


भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही  

 मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर  युपीएससीसमोर स्पष्टीकरण देण्यास अपयशी ठरल्या. पूजा खेडकरला 30 जुलैपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली होती. पण यामध्ये त्यांना उत्तर देता आलं नाही. त्यामुळे युपीएससीने मोठा निर्णय घेत पूजा चव्हाणला दोषी ठरवलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा-2022 (CSE-2022) ची तात्पुरती शिफारस केलेली उमेदवार पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांची तात्पुरती उमेदवारी रद्द केली आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे काढून टाकल्याची माहिती युपीएससीने दिली आहे. युपीएससीने उपलब्ध नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आहेत आणि नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल तिला दोषी आढळले आहे. पूजा चव्हाणलाा भविष्यातील सर्व परीक्षांमधून कायमचे काढून टाकण्यात आले आहे, अशी माहिती युपीएससीने अधिकृतरित्या दिली आहे. पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षेत उमेदवारी मिळवण्यासाठी अपंगत्व आणि इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेयर) कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

पूजा खेडकरांच्या वकिलांचा युक्तीवाद
पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामिनावर पटियाला हाऊस कोर्टात (Patiala House Court) सुनावणी सुरू असताना पूजाच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. लैंगिक छळाची तक्रार केल्यानंच आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना टार्गेट करण्यात आला आहे, असा युक्तीवाद पूजा खेडकरांच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. पूजाला अटक होण्याचा धोका आहे असं माधवन यांनी कोर्टात सांगितलं. पूजा खेडकर फ्रॉड नाही तर फायटर असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.