Advertisement
बीड : भाजपच्या विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. लातूर-बीड रस्त्यावर या दोन नेत्यांची भेट झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रेला शुभेच्छा दिल्या. यातचे फोटो पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहेत. या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? याचीही माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. भाजपच्या बैठकीतील मुद्द्यांवरही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेलाही पंकजा मुंडेंनी उत्तर दिलं आहे.
आमची भेट अत्यंत योगायोगाने झाली होती. मी लातूरकडे येत होते आणि ते कदाचित बीडकडे जात होते. त्यांना पाहिल्यानंतर मी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. त्यांची यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये आमचा सहज आणि घरगुती संवाद होता, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.राजकारणामध्ये वंचितांना, ज्यांचा आवाज कोणीच ऐकू शकत नाही. त्यांना शक्ती देण्यासाठी गोपीनाथ मुंडेसाहेब राजकारणात आले होते.
