#

Advertisement

Thursday, August 1, 2024, August 01, 2024 WIB
Last Updated 2024-08-01T13:12:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसळे यांचे अभिनंदन

Advertisement

ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी दिल्या शुभेच्छा 
पुणे : कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन. बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई यांनी कुसळे यांनी ऑलम्पिक मध्ये मिळवलेल्या यशाचे कौतुक केले आहे. त्या म्हणल्या की, परंतू त्याचा कोल्हापूर ते पॅरिस हा स्वप्नील कुसाळे याचा ऑलिम्पिक प्रवास सोपा नसतो. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे शिक्षक. आई अनिता गावच्या सरपंच आहेत.तर, स्वप्नील पुण्यात रेल्वेच्या सेवेत आहे. मागच्या 10-12 वर्षात स्वप्नील कुसाळेने ज्यूनियर आणि सीनियर स्तरावर छाप उमटवली होती, तेव्हापासून तो परिचित खेळाडू झाला आहे. खरं तर नेमबाजीचा खेळ खर्चिक आहे. जॅकेट, गन, बुलेट यासाठी बराच पैसा लागतो. नेमबाजीच्या खेळात एकाग्रता जशी महत्त्वाची तितकाच सरावही आवश्यक असतो. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. त्याच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज काढून त्याला नेहमीच प्रोत्चाहन दिले. स्वप्नीलच्या आजच्या यशाच श्रेय त्याचे वडील सुरेश कुसाळे यांनाही जाते, असेही  ऍड. कोमलताई यांनी  सांगितले.