#

Advertisement

Friday, August 2, 2024, August 02, 2024 WIB
Last Updated 2024-08-02T12:11:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

राज्य शासनाकडून आर्टीची स्थापना ; बहुजन रयत परिषदेचे मोठे यश

Advertisement

माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केला सातत्याने पाठपुरावा 

मंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेच्या पार्श्‍वभूमीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्याची मागणी बहुजन रयत परिषदेकडून करण्यात आली होती. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्याात येत होता, या माागणीला यश आले असून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त गुरूवारी (ता.1) मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आर्टी या संस्थेची स्थापना, कंपनी नोंदणी कायदा, 2013 अंतर्गत नियम 8 अनव्ये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत राज्य शासनाचे मातंग समाजाकडून आम्ही आभारही व्यक्त केल्याचे अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.

याबाबत माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की. अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणार्‍या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक संस्कृती व राजकीय असा सर्वांगी विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषय कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचविण्यासाठीची (आर्टी) स्थापना करण्याची मागणी मातंग समाजातर्फे बहुजन रयत परिषदेने केली होती, त्यास यश आले. शासनाने याकामी दखल घेतल्यााचे समाधान आहे. 

याबाबत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. कोमलताई साळुंंखे-ढोबळे यांनी सांगितले की, आर्टी स्थापन करण्याबाबत 2024-25च्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि. 11/7/2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती यामध्ये मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मदगी, मदिगा या समाजाच्या विकासाकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) पार्श्‍वभूमीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण स्थापनेची  (आर्टी) करण्याचा निर्णय शासनाने घेतला  या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत दि.11/7/2024 रोजी समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली. आर्टी या संस्थेची स्थापना, कंपनी नोंदणी कायदा, 2013 अंतर्गत नियम 8 अनव्ये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. याबाबत राज्य शासनाचे मातंग समाजाकडून आम्ही आभारही व्यक्त केले. त्यानुसार अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी मुुंबई येथे या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, या कार्यक्रमाावेळी माजी मंत्री तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे आणि बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना व्यासपीठावर मानाचे स्थान देण्यात आले होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शंभूराज देसाई, आमदार अमित गोरखे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, ‘आर्टी‘चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे आदी मान्यवर उपस्थित होते.