#

Advertisement

Friday, August 2, 2024, August 02, 2024 WIB
Last Updated 2024-08-02T12:44:41Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

पूजा खेडकर दुबईत पसार?

Advertisement

अटकपूर्व जामीन फेटाळला : आणखी एक नवा कारनामा उघड 
मुंबई : पूजा खेडकर हिला अटक होऊ शकते. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूजाचा IAS दर्जाच रद्द करण्याचा निर्णय UPSCनं काल घेतला. तर पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळलाय. एवढंच नव्हे तर ओबीसी आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कुणी सवलती लाटल्यात, याची चौकशी करण्याचे आदेशही न्या. देवेंद्र कुमार जंगाला यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिले आहेत.
दरम्यान, पूजा खेडकरनं दुबईत पलायन केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. एका वृत्तपत्रानं यासंदर्भात दावा केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगापाठोपाठ दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टान दणका दिल्यानंतर पूजा खेडकर दुबईत गेल्याची माहिती मिळत आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएएस दर्जा मिळवल्याचा ठपका तिच्यावर आहे. गेल्या 10 दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे. मसुरीच्या IAS प्रशिक्षण संस्थेनं तिला परत बोलावलं. मात्र ती हजर झालेली नाही. वाशिममधून निघालेली पूजा खेडकर नक्की कुठं आहेत, याचा ठावठिकाणा लागत नाही. कोर्टानंही तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. आता पूजा खेडकर दुबईत पसार झाल्याचा एका वृत्तपत्राने दावा केला आहे.