Advertisement
अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी घेतली बहुजन समाजाच्या प्रश्नांसाठी घेतली भेट
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजातील अनेक प्रश्न समस्या आजही कायम आहेत, गेल्या काही वर्षांत सामान्य जणांकडे लक्ष देण्यास कोणत्याच राजकीय पक्षाला वेळ मिळालेला नाही, केवळ राजकीय हेतुने शासनाचा कारभार सुरू आहे, यापार्श्वभूमीवर बहुजन जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी बहुजन रयत परिषदेच्यावतीने राज्यभरात संवाद अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भातील अहवाल प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हाती दिला.
बहुजन रयत परिषदेच्या वतीने दि. 21 जुलै ते 28 जुलै 2024 या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात संवाद अभियान दौरा काढण्यात आला. या दौर्यात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांशी संवाद साधल्यानंतर बहुजन समाजाचे अनेक गहन प्रश्नन समोर आले. हे प्रश्न संघटनेच्या वतीने आम्ही शासन दरबारी मांडू, असा शब्द प्रदेशाध्यक्षा अॅड. कोमलताई यांनी दिला होता. त्यानुसार वंचित बहुजन समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष अॅड.कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा केली. तसेच राज्यातील बहुजन समाजाच्या विविध महत्वाच्या मागण्यांचे निवेदन देऊन जनतेच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले.
