#

Advertisement

Monday, August 12, 2024, August 12, 2024 WIB
Last Updated 2024-08-12T11:43:02Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुती करणार लवकरच जागावाटपाची घोषणा

Advertisement

भाजपाला सर्वाधिक जागा
मुंबई : महायुतीतील जागावाटप जवळपास निश्चित झाल्या आहेत. 20 ऑगस्टला जागावाटपाची अधिकृत घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली . अंबाबाईचे दर्शन घेऊन तिन्ही पक्षाचे नेते जागावाटपाची घोषणा करतील, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीची पक्षाची संपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेच्या जागा निश्चितीचा अधिकार, मतदारसंघात फेरबदल करण्याचेही अधिकार फडणवीसांकडे देण्यात आले आहेत. पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चित करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र महायुतीचे निर्णय वरिष्ठ पातळीवर मित्रपक्षांशी चर्चा करून घेतले जाणार आहेत. राज्यात भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं मत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती मिळते. भाजपमध्ये जागावाटपात मोठा फेरबदल होण्याचीही शक्यता आहे.