Advertisement
खासदार सुप्रिया सुळेंच महत्त्वाचं विधान
पुणे : या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, महाराष्ट्राचे सरकार हे मंत्रालयातून नव्हे तर दिल्लीतून चालते, अनेकदा फडणवीस हे दिल्लीतून माध्यमांशी बोलतात आणि गृहराज्यमंत्री उपलब्धच नसतात. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या पण प्रत्यक्षात राज्यातील गृह विभागाची स्थिती दयनीय आहे.पुढील पंधरा दिवसात महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार कोठून निवडणूक लढवणार याचे चित्र स्पष्ट होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी सुळे बोलत होत्या.
राज्यातील महिलांवर अत्याचाराचे प्रमाण कमालीचे वाढले आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मी वैयक्तिक टीका करत नाही पण गृहमंत्री म्हणून त्यांचे अपयश आहे, असे सांगत सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढतेय हा केंद्राचा डेटा आहे, दोनशे कोटी जाहिरातींवर खर्च करायला आहेत पण गुन्हेगारी थांबविण्यात सरकारला अपयश येत आहे, अशी टीका ही सुळे यांनी केली.
