#

Advertisement

Wednesday, August 21, 2024, August 21, 2024 WIB
Last Updated 2024-08-22T12:29:20Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"त्या" आरोपीला भयावह, कठोर शिक्षा व्हावी : ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे

Advertisement

प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी गृहमंत्र्यांना दिले निवेदन 

पुणे : बदलापूर येथील शाळेतील विद्यार्थिनींवर अत्याचाराच्या घटनेचे तिव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना बहुजन रयत परिषदेच्यावतीनेही करण्यात आला आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी शासनाच्या गृहविभागासह पोलीस यंत्रणेवरही ताशेरे ओढले, याविषयी प्रदेशाध्यक्ष ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी गृहमंत्र्यांना दिले निवेदन दिले आहे. 
शासनासह संबंधित शाळा प्रशासनाच्या त्रुटीही उघड केल्या. ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले की, कायदा आणि सुव्यवस्था कितीही प्रगत असली तरी आपल्या फायद्यानुसार वळवण्याची विकृती थांबवणे गरजेचे आहे. बलात्काराच्या लाखो केसेस न्यायव्यवस्थेकडे प्रलंबित आहेत. या 10 वर्षातील एखादी अशी कोणती रेप केस आठवते का की, याातील आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा झाली आहे. बदलापूर केसमध्ये बदलापूर नागरिकांना मी कळकळीचे आवाहन करते. एक पालक आणि कर्तव्यदक्ष नागरीक म्हणून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आपला पवित्रा रास्त आहे. पण आपले लक्ष आता आरोपीला कायदेशीर कठोर शिक्षा होण्यावर असले पाहिजे. प्रत्येकवेळी अशा घटना घडल्यानंतर तात्पूरता निषेध, आंदोलन, गदारोळ करणे थांबवून आरोपीला मिळणारी शिक्षा इतकी भयावह असली पाहिजे की त्या शिक्षेची दहशत अशा नराधमांमध्ये कायम घर करून राहिली पाहिजे. कारण आपण हेच करायला कमी पडतो; म्हणून आपल्या लेकीबाळी अशा घटनांना बळी पडत आहेत. हिला व युवतींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि अल्पवयीन मुलींना गुड टच-बॅड टचचे प्रशिक्षण देणे बंधनकारक असायला हवे, असे ही ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सांगितले.