Advertisement
वाशिम : आमदार भावना गवळी आणि पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले असल्याच दिसून येत आहे. दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. भावना गवळी आणि राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. यावर राठोडांना विचारले असता आमच्यात कुठलेही मतभेद नसल्याचं म्हटल आहे.
शिवसेना शिंदे गटांचे आमदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांची अनेक दिवसांपासून श्रेयवादामूळ राजकारणात कुरघोडी पाहायला मिळत होती. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वाशिम यवतमाळ शहरामध्ये लावलेल्या दोघांमध्ये बॅनरवार देखील पाहायला मिळाल असून दोघांमध्ये प्रचंड एकमेकांविरुद्ध नाराजीचा सूरही उमटत होता. मात्र, आज वाशिम मध्ये पालकमंत्री संजय राठोड वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असता नियोजन भवन येथे भावना गवळी व संजय राठोड यांची दिलखुलास चर्चा झाली आहे.
महायुतीच सरकार आणण्यासाठी आमदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड पुन्हा एकत्र आले आहेत. दोघांमधील मतभेद बाजूला ठेऊन दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळत आहे.
