#

Advertisement

Tuesday, August 20, 2024, August 20, 2024 WIB
Last Updated 2024-08-20T12:52:09Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर

Advertisement

अहमदनगर ; मध्ये 2023 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य होतं. अन्यथा तिच्यासाठी वॉरंटदेखील निघू शकलं असतं. असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलंच. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.
रंगीबेरंगी साड्या, लक्षवेधी हावभाव असा गौतमी पाटीलचा कार्यक्रमात लूक असतो. पण अहमदनगरच्या न्यायालयात हजर राहिलेल्या गौतमी पाटीलला ओळखणं मात्र कठीण झालं होतं. कारण यावेळी गौतमी पाटील चेहऱ्याला स्कार्फ बांधून अतिशय साधा ड्रेस घालून न्यायालयात हजर झाली होती. अशा अवस्थेत गौतमी पाटीलला ओळखणं देखील कठीण झालं होतं.