#

Advertisement

Friday, August 23, 2024, August 23, 2024 WIB
Last Updated 2024-08-23T11:42:48Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्र बंद करता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Advertisement


मुंबई : बदलापूर अत्याचार घटनेनंतर राज्याचे राजकारण तापले आहे.  महाविकास आघाडीने शनिवारी म्हणजे 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.  मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडी जबरदस्त झटका दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही अशी टिपण्णी कोर्टाने केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही, जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र बंद करता येणार नाही असे न्यायालयाने सांगूनही विरोधक कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहेत. बंदबाबत  उच्च न्यायालयाने विरोधकांना चपराक दिली आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

विरोधकांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर आहे. कुणालाही अश्याप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं सरकारकडून सांगण्यता आलंय.. बंद करणा-या आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सरकारकडून उच्च न्यायालयाला सांगण्यत आल आहे. उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात गुणरत्न सदावर्तेसह  इतरांनी याचिका दाखल केलीय, त्याविरोधात सुनावणी सुरू आहे.. डॉ. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची बंद विरोधात याचिका दाखल केली आहे.  महाविकास आघाडीनं आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप करण्यात आला आहे.  मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.