#

Advertisement

Saturday, August 31, 2024, August 31, 2024 WIB
Last Updated 2024-08-31T14:57:53Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

तानाजी सावंत यांच्या पुतण्याने घेतली शरद पवारांची भेट

Advertisement

पंढरपुर : शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले होते. त्यानंतर भाजप प्रवक्ते महेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबत युती आमचे दुर्देव आहे, असे म्हटले. परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यानेच शिवसेना मंत्री तानाजी सावंत यांच्यावर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जनतेसाठी उठाव केला. मात्र नुकतेच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना पंढरपुरात जाऊन भेटले. आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे, असा संदेश घेऊन त्यांनी ही भेट घेतली, असा दावा सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पक्षातील शिवसैनिकानेच घरचा आहेर दिला आहे. मनीष काळजे म्हणाले की, तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची नुकतीच भेट झाली. अनिल सावंत यांनी आरोग्यमंत्र्यांनी मला पाठवले आहे, असा संदेश शरद पवार यांना दिला. याबद्दलची माहिती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. तानाजी सावंत यांनी पक्षाला अल्टीमेटम देण्याचा प्रयत्न करु नये. त्याचे परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा मनीष काळजे यांनी दिला आहे.