#

Advertisement

Wednesday, August 28, 2024, August 28, 2024 WIB
Last Updated 2024-08-28T18:01:38Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक

Advertisement

ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु 
केज : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगीता ठोंबरे या केजमधील दहिफळ वड माऊली येथील कार्यक्रमात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कारवर अचानक अज्ञातांकडून संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथ गेल्या होत्या. संगीता ठोंबरे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे यांना लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.