Advertisement
वाघेबाभुळगाव : बहुजन रयत परिषद आणि वाघेबाभुळगाव ग्रामस्थांच्या वतीने साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.31) सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बहुजन रयत परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांनी दिली.
यावेळी होणार्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री तथा बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळंुंखे-ढोबळे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ कुचेकर, नंदुदादा मोराळे, माजी सभापती संतोष हांगे, नांदुरघाटच्या प्रा.डॉ.द्वारका गिते-मुंडे, बीड न्यायालयाच्या अॅड. पुजा जाधव हे उपस्थित राहणार आहेत तर बीड जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष रमेश आडसकर, मा.जि.प.सदस्य प्रा.सुशीला मोराळे, बहुजन रचत परिषदेचे सरचिटणीस ईश्वर क्षिरसागर, संपर्क प्रमुख दत्ता पाटील, प्रदेध उपाध्यक्ष ना.म.साठे, केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, बीड जि.प.सदस्य रमाकांत मुंडे, लेखाधिकारी ए.बी.घायाळ, वाघेबाभुळगावचे सरपंच विक्रम डोरले, केज पं.स.सदस्य प्रेमचंद कोकाटे, वाघेबाभुळगाव सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव दराडे, लोकपत्रकार श्रीकांतराजे जाधव, मा.अध्यक्ष उमेश वाघ, माजी हेड कॉन्स्टेबल अशोक मेसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
