#

Advertisement

Tuesday, August 27, 2024, August 27, 2024 WIB
Last Updated 2024-08-27T13:36:15Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

देवेंद्र फडणवीस कधी निर्णय घेतात, याची वाट पाहतोय !

Advertisement

पुणे : राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतंच राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझी शरद पवारांशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. देवेंद्र फडणवीस याबद्दल कधी निर्णय घेतात, याची मी वाट पाहत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांची वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधील बैठक संपल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी होणार असल्याचे बोललं जात आहे. जवळपास दोन-अडीच तास हे दोन्हीही नेते चर्चा करत होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवारांशी कोणत्या विषयांवर चर्चा झाली? भाजपला सोडचिठ्ठी देणार का? आगामी निवडणूक लढवणार का? यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मी शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होतो. त्यानुसार त्यांनी मला आज भेटण्यासाठी वेळ दिली. यावेळी शरद पवारांशी वसंत दादा शुगर इन्स्टिट्युटमधील काही विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत शरद पवारांशी याच मुद्द्यांवर चर्चा केली. शरद पवार आणि माझी अडीच-तीन तास बैठक सुरु होती. पण यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्याबद्दल माझ्याशीही कोणीही बोललं नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.