#

Advertisement

Tuesday, August 27, 2024, August 27, 2024 WIB
Last Updated 2024-08-27T13:44:21Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण?

Advertisement

अजित पवार यांनी स्पष्टच करून सांगितले 
पुणे : राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. अशात महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याची चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. अजित पवार यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन झालं. यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या बैठका झाल्या. त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सरकार आल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू, असं अजित पवार यांनी स्पष्टच करून सांगितले.