#

Advertisement

Monday, August 12, 2024, August 12, 2024 WIB
Last Updated 2024-08-12T12:21:11Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

साताऱ्यात शरद पवार यांना मोठा झटका

Advertisement

दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात केला प्रवेश 

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना साताऱ्यात मोठा झटका बसला आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाचे साताऱ्यातील दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे साताऱ्यात आगामी विधानसभा निवडणुकीचं गणितं बदलण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यामुळे शरद पवार यांना साताऱ्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणाऱ्या या दिग्गज नेत्याचं नाव माणिकराव सोनवलकर असं आहे. माणिकराव सोनवलकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेत्या चित्रा वाघ आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत सोनवलकर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार, माणिकराव सोनवलकर यांच्यासोबत शरद पवार गटाच्या जवळपास 5 हजार कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोनवलकर हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला साताऱ्यात आगामी विधानसभेत मोठा फायदा होणार आहे.