#

Advertisement

Thursday, September 19, 2024, September 19, 2024 WIB
Last Updated 2024-09-19T11:19:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

भाजपसाठी 85 जागा महत्त्वाच्या : मतदारसंघाची ए, बी, सी विभागात वर्गवारी

Advertisement

2019 मध्ये जिंकलेल्या काही जागा धोक्यात 
मुंबई : महायुतीचे जागावाटप अद्याप पूर्ण झाले नसले तरी भाजपने विनिंग मेरिटच्या आधारे विधानसभा मतदारसंघाची ए, बी, सी अशा तीन विभागात वर्गवारी केली आहे. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 105 जागा जिंकल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर बदललेले वातावरण पाहता भाजपने जिंकण्याची अधिक हमी असलेल्या विधानसभेच्या 85 जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत यासंबंधी रणनीती निश्चित करण्यात आली आहे. 
भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या 85 विधानसभा मतदारसंघांपैकी 25 मतदारसंघ असे आहेत की जिथे भाजपला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या जागा धोक्यात असून त्या निवडून आणण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल, असा सूर भाजपच्या बैठकांमध्ये व्यक्त झाल्याचे समजते. मात्र, धोक्यात असलेल्या काही जागा गमावल्यास गेल्या निवडणुकीत कमी मताधिक्याने गमावलेल्या जागा जिंकून त्याची भरपाई करता येऊ शकते. याशिवाय, गेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ज्या जागा कमी फरकाने जिंकल्या होत्या, ते मतदारसंघदेखील यंदा धोकादायक श्रेणीत टाकण्यात आले आहेत.
भाजपकडून विधानसभेची रणनीती आखताना सुरुवातीपासूनच संघाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकांमध्ये सामील करुन घेतले जात आहे. भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी 2014,2019 आणि 2024 लोकसभा या तीन निवडणुकांमध्ये भाजपला झालेले बूथनिहाय मतदान आणि यावेळी किती मते मिळू शकतात, याचा विचार करुन 85 विधानसभा मतदारसंघांची ए,बी, सी अशा तीन कॅटेगरीत विभागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीत भाजप 155 ते 160 जागांवर उमेदवार उभे करेल, असा अंदाज आहे. त्यापैकी 125 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने ए,बी,सी कॅटेगरीतील 85 जागा जिंकणे भाजपच्यादृष्टीने अत्यंत गरजेचे आहे.