#

Advertisement

Thursday, September 19, 2024, September 19, 2024 WIB
Last Updated 2024-09-19T11:28:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

“माझ्या वडिलांच्या वारशावर मी काम करते, याचा मला अभिमान"

Advertisement

मुक्ताईनगर : रूपाली चाकणकर यांनी मुक्ताईनगरमध्ये येऊन राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंवर टीका केली. वडिलांच्या जनाधारावर निवडणूक लढवत आहेत, लाडक्या बहिणींच पंधराशे रुपयाने काय होतं? यावरून वाक युद्ध सुरू झालं. एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रूपाली चाकणकर ह्या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत’ असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या, नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांवर टीका केली. “माझ्या वडिलांच्या वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे. माझ्या वडिलांचा वारसा घेऊनच मी पुढे गेली आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
“तुमच्या नेहमीच्या वक्तव्याबाबत खाली येत असलेल्या कमेंट एकदा वाचा. मग तुम्हाला तुमचं अस्तित्व कळेल. ज्यांचं नगरपालिकेत डिपॉझिट जप्त झालंय अशा लोकांचा जनाधारक शिल्लक राहिलेला नाहीय. रूपाली चाकणकरांच्या वक्तव्याला मी फार महत्त्व देत नाही” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. “रूपाली चाकणकर ह्या शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने सध्या पद भोगत आहेत. शरद पवार साहेबांच्या भरोशावर आतापर्यंत पद यांना मिळत आली आहेत” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.