#

Advertisement

Saturday, September 28, 2024, September 28, 2024 WIB
Last Updated 2024-09-28T11:31:12Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध

Advertisement


आयोगाची महत्त्वाची माहिती; तक्रारीसाठी ॲप 

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या 2 दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठीची महत्वाची माहिती दिली. राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. तसेच, निवडणूक काळात काही निर्बंध घालण्यात येणार असून एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचे बंधन असणार आहे. तसेच, याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल, असेही राजीव कुमार यांनी म्हटलं आहे. 
राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार 4. 95 कोटी आणि स्त्री मतदार 4.64 कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 असून राज्यातील दिव्यांग मतदार 6.32 लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार 19.48 लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून 10.77 लाख मतदार आहेत. 
या अॅपवर तक्रार करता येणार
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणीं काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणुक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.